साहिल कबीर | Sahil Kabir
समाजातील अल्पसंख्य, वंचित तसेच नाकारलेल्या समाजघटकांच्या जगण्यातील अगतीकता, कोंडमारा व त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा, शासनप्रशासनाचा दृष्टीकोन याचे यथार्थ चित्रण उभे करणारा तरूण लेखक म्हणून साहिल कबीर ओळखले जातात.
विद्यापीठीय अभ्यासक्रमात निवडक साहित्याचा समावेश करण्यात आलेला आहे. फॉर्मलेस, सविनय अस्वस्थ, कथागत आणि सोलोकोरस हे प्रकाशित साहित्य.