AGITATE! साजरा करीत आहे! प्रा. शैलजा पाईक यांची मॅकआर्थर फेलो म्हणून झालेली निवड

“वैश्विक मानवता आणि वैश्विक मुक्ती या बाबत विचार करण्याच्या नव्या वाटा आपण लोकांच्या अमानुषीकरणाची प्रक्रिया आणि असमानतांचा अभ्यास करून देऊ शकतो.”

 

हि संघर्षमय अंतर्दृष्टी इतिहासकार शैलजा पाईक यांनी मांडली आहे, ज्यांनी दलित स्त्रियांच्या जीवनावरील अभ्यासांतून आधुनिक भारतातील जात, लिंगभाव, लैंगिकता यांचा इतिहास अतिशय एतत्देशिय, सर्जनशील आणि काटेकोर पद्धतीने मांडला आहे, आणि त्यातून सिमान्तिकीकरण झालेल्या समूहांचा संघर्ष आणि सत्ताकारणाच्या प्रक्रिया आपण कशा अभ्याव्या आणि त्यावरती कसे लिहावे यात मुलभूत बदल घडवून आणला आहे. २०२४ च्या मॅकआर्थर फेलो म्हणून झालेली पाईक यांची निवड AGITATE! साजरी करत आहेत. पाईक यांच्या बरोबर हा पुरस्कार अतिशय प्रेरणादायी अशा आणखीन २० लोकांना मिळाला आहे, ज्यात कवी जेरीको ब्राऊन, चित्रपट निर्माते स्टरलिन हारजो, कायदेपंडित आणि सार्वजनिक धोरणांची अभ्यासक डॉरथी रॉबर्त्स आणि दिव्यांग न्यायावर काम करणारी एलीस वोंग यांचा समावेश आहे. ह्या मॅकआर्थर फेलोशिपला “जीनियस ग्रांट” असेही म्हणतात कारण हि  ८००,००० डॉलर्सची रक्कम कुठल्याही अटी-तटीशी जोडलेली नाही,तर आपल्या कामात जगावेगळी सर्जनशीलता ज्यांनी दाखवली आहे आणि जे पुढेही असेच काम करत राहतील त्यांना बहाल केली जाते. 

 

प्रस्थापित ज्ञान निर्मितीच्या व्यवस्थांना शैलजा पाईक यांनी दिलेल्या संघर्षमय योगदानाची योग्य ती घेतलेली दखल हा जागतिक पातळीवरील उच्च शिक्षणाच्या पटलावर एक महत्वाचा क्षण आहे. युद्धजन्य, नरसंहाराच्या काळात आपण जगात असताना, संघर्षांतून आपण ज्ञान आणि चिकित्सेच्या शक्यता वाढवू, गहिऱ्या करू आणि नव्याने कल्पू, अशी आपल्याकडून मागणी पाईक यांचे काम करते. ज्या योगे आपण व्यवस्थात्मक रित्या ज्याचे सिमान्तीकरण झाले आहे, जे उपेक्षित रहिले आहे, ज्यांना दाबून टाकण्यात आले आहे, त्या सर्वांना अर्थपूर्ण जगण्याची, सर्जनशील जीवनाची शक्यता निर्माण करून शकू, ज्यात संघर्षाचे आणि त्याच्या बाहेरचे, अशा सर्व  अवकाशांचा समावेश असेल. आम्ही ह्या पुढे हि प्रा. पाईक यांच्या धाडसी कामातून शिकत राहू आणि वैश्विक मानवता आणि वैश्विक मुक्ती यांच्या शोधात त्या त्यांच्या कामातून जी  बौद्धिक आणि राजकीय आव्हाने पुढे अनीत आहेत, त्यांचा आनंदाने स्वीकार करू.

TRANSLATION: ENGLISH