नवीन गाझा

माझ्या बाळा, आता वेळ उरली नाही
उगीच आता आईच्या गर्भाशयात पडून राहु नकोस
माझ्या छकुल्या, घाई कर आणि पटकन बाहेर ये बरं.
फक्त माझ्या इच्छेसाठी नाही रे, तर इथे युद्धाने धुमाकूळ घातला आहे.
मला भीती वाटते की तुला ही तुझी जन्मभूमी
मला वाटते जशी तुला दिसायला हवी, तशी तुला दिसणार नाही

तुझा देश म्हणजे काही जमीन किंवा समुद्र नाही की
ज्यानी आपले नशीब बघितले आणि नष्ट झाले .
माझ्या बाळा, तुझी माणसे महत्त्वाची, ये लवकर ये आणि त्यांची ओळख करुन घे
नाहीतर बॉम्बमुळे त्यांच्या विटलेल्या विकृत देहांचे दर्शन घडेल आणि
मला जबरदस्तीने त्यांचे देह गोळा करुन तुला दाखवायला लागेल,
तुला समजायला , की ती माणसे पण खूप सुंदर आणि निर्दोष होती
त्यांना पण तुझ्यासारखी छान मुले होती.
त्यांना ती दूर पाठवावी लागली, जन्माची अनाथ करुन ,
मृतदेहांच्या ढिगाऱ्यामध्ये पडण्यापासून वाचविण्यासाठी !

तुला जर बाहेर यायला उशीर झाला
तर तुझा माझ्या वर विश्वास बसणार नाही
आणि वाटेल की ह्या देशामध्ये माणसेच नाहीत
दोनदा हद्दपार केले , निर्वासित केले ,आम्ही बंड केले .
दुर्दैवाने पंच्याहत्तर वर्षानंतर पुन्हा नशिबाने कळ काढली
सगळ्या आशा खलास झाल्या

माझ्या मनावरचे ओझे खूप जड झाले आहे
तुला छोटुल्या बाळाला तर सहन करणे फारच कठीण हे
मला माहीत आहे , पण तू मला क्षमा कर
छोट्या हरिणाला जन्माला घातले आहे पण
बाहेर भक्ष्यासाठी वाट पाहणाऱ्या तरसांच आक्रमणा होवू शकेल
ह्याची भीती वाटते . पटकन बाहेर ये लाडक्या !
जेवढ्या जोरात धावशील तेवढे धावून दूर दूर जा
म्हणजे मग खंत वाटून माझी जळजळ होणार नाही

काल रात्री ह्या निराशेमुले मी दमुन कोसळले
मनात म्हटले , शांत रहा
ह्याचा छोट्या बाळाशी काय संबध ?
माझ्या चिमुकल्या , हवेतल्या झुळकी सारखा तू ,
तुझा भयानक सोसाट वादळाशी काय संबध ?
पण आज परत मला उरावर धीर करुन
ही ठळक बातमी तुला सांगायला लागत आहे
आज वैर्यानी गाझातल्या बाप्टिस्ट हॉस्पिटल वर
बॉम्ब टाकला , 500 माणसे घायाळ झाली
त्यामध्ये एक लहान मूल होते
त्याच्या भावाला हांक मारत होते
भावाचे डोळे उघडे होते पण अर्धशिर उडून गेले होते
दादा, तुला मी दिसतो का ? त्याला तू दिसत नाहीस,
अगदी वेड्यापिशा जगासारखा
ज्यानी दोन तास ह्या मारेकरींची निन्दा निर्भत्सना केली
मग झोपून सुस्त झाले, ह्या छोट्यामुलाला विसरण्यासाठी
आणि त्याच्या भावाला पण
जो स्वताचे डोळे उघडे असूनही भावाला बघू शकत नव्हता!
आता काय मी तुला सांगू?
आघात आणि प्रलय ह्या दोन सख्या बहिणी
दोघी अगदी भडक आणि रागीट, आक्रमण केले माझ्यावार
त्यामुळे माझे ओठ थरथरले आणि मी त्यांना दिला, त्या प्रेतांच्या वतीने
माझा लाखो शिव्यांचा हार !

युद्धामध्ये कोणत्याही कवीवर विसंबून राहता येत नाही
तो कासवासारखा अगदी हळू हळू जाऊन त्या कत्तल करणाऱ्या,
जोरात धावणाऱ्या सशाबरोबर निष्फळ शर्यत लावण्याचा प्रयत्न करतो .
कासव सरपटत जाते अणि ससा मात्र एकामागून एक निर्घृण हत्याकांडामधल्या
गुन्ह्यामध्ये उड्या मारतो आहे
अगदी ऑर्थोडॉक्स चर्चच्या बॉम्ब पासून तर
पूर्ण धुळीला मिळवलेल्या मॉस्कपर्यन्त , अगदी ईश्वराच्या पवित्र सुरक्षित गाभाऱ्यात !
हा ईश्वर आहे कुठे ?
जो आपले रक्षण करणार तोच एकटा विमान चालवतोय
कोणाच्याही सोबतीशिवाय
फक्त त्यात एक प्रवासी माणूस, जो आपल्यावर बॉम्ब करण्यासाठीच बसला आहे
आमची शरणागती हेच लक्ष्य ठेवून
माझ्या चिमुकल्या लाडक्या बाळा,
आता येशुच्या क्रूसावर सर्व पंथांच्या प्रेषितांसाठी
पुरेल एवढी जागा आहे
पण तू व तुझ्या सारख्या निष्पाप गर्भाना ते अजुन समजायचे आहे


Marathi translation of Marwan Makhoul’s poem, New Gaza, by Anamika

Article by: